ग्रामपंचायत रायांबे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

रायांबे हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक निसर्गरम्य व प्रगतशील गाव आहे. गावाची लोकसंख्या जनगणना २०११ नुसार १११४ असून एकूण कुटुंब संख्या २१० आहे. यामध्ये अनुसूचित जातीची संख्या ११९, अनुसूचित जमाती ३७३ तर इतर वर्ग ६२२ आहेत. गावाचे अक्षांश १९.७९६७४९० आणि रेखांश ७३.५९३३०३० आहे. गावात शैक्षणिक सुविधेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा रायांबे व जि.प. शाळा पिंगळेवाडी या दोन शाळा आहेत. गावात व्यायामशाळा, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, व सभामंडप अशी जनसुविधा विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.

रायांबे २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
मापदंडमाहिती
गावाचे नावरायांबे
तालुकाइगतपुरी
जिल्हानाशिक
लोकसंख्या (२०११)१११४
एकूण कुटुंब संख्या२१०
अनुसूचित जाती११९
अनुसूचित जमाती३७३
इतर६२२
अक्षांश१९.७९६७४९०
रेखांश७३.५९३३०३०
जिल्हा परिषद शाळा२ (रायांबे आणि पिंगळेवाडी)
व्यायामशाळाहोय
पाण्याची टाकी (जलजीवन मिशन)उपलब्ध
सभामंडपउपलब्ध
कृषी सेवकसौ. योगेश दाते
मुख्याध्यापक (पिंगळेवाडी)श्री. ज्ञानदेव पवार
मुख्याध्यापक (रायांबे)श्री. पुंडलिक जगताप
ग्रामपंचायत प्रशासकश्री. रविंद्र अहिरे
ग्रा.पं. अधिकारीश्री. शरद रहाडे
शिपाईश्री. कैलास बिडवे
पाणीपुरवठा कर्मचारीश्री. दत्तू धांडे

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी